‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले.

सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. नुकताच त्याचा एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

Spread the love